आजचे स्वराज्य
माझ्या दारावर आलं एक अद्वितीय सौभाग्य
भेट झाली त्यांच्याशी ज्यांनी उभं केलं मराठी साम्राज्य।
मी केला त्यांना एक आदराचा मुजरा
त्यांनी स्वीकारला आणि मी केला तो क्षण साजरा।
मला आले प्रश्न अनेक
पण राजेंनी विचारला प्रश्न फक्त एक।
राजे म्हणाले, माझं नाव मोठं की स्वराज्याचा विचार?
मी म्हटलं, राजेंचं नाव होतं खूप साजरं, पण स्वराज्यावर आला आहे नको तो अहंकार।
अहंकार?! कसला अहंकार? विचारलं राजेंनी।
भाषेच्या आणि स्वतःला खूप मोठं दाखवायचा, मी म्हटलं लाजेने।
राजे गरजले अहंकार असावा तर स्वतःच्या स्वराज्यावर केलेल्या योगदानाचा।
स्वतःच्या भाषेचा तर अभिमान वाटावा, अहंकार नव्हे।
आजच्या पिढीला स्वराज्य निर्माण करावे तर स्वतःमध्ये,
मुघल शोधावे आणि मारावे तर आपल्या मध्ये।
मी राजेंची माफी मागितली आणि वचन दिलं
की स्वतःमध्ये करणार स्वराज्याचं निर्माण
आणि देणार देशाच्या निर्मितीत योगदान।